महाराष्ट्रातील सर्वाधिक नामांकित डिजिटल शैक्षणिक पोर्टलवर तुमचे सहर्ष स्वागत...!


Choose from a selection of top selling online video courses with new courses added regularly.

शेकडो शिक्षकांनी गौरविलेले कोर्सेस 

कोरोना काळात 1,50,000 पेक्षा जास्त शिक्षकांनी अनुभवलेले कोर्सेस, बेसिक पासून अड्व्हांस तंत्रज्ञान शिकण्यास उपयुक्त, काही मोफत कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत...

शिका तुमच्या वेळेनुसार 

कोणत्याही डिव्हाईसवरुन, कोणत्याही वेळेस आपल्या सोयीनुसार शिकण्याची सोय तसेच लाईव्ह/रेकोर्डेड दोन्ही प्रकारातील कोर्सेस वाजवी किमतीत उपलब्ध

तंत्रस्नेही शिक्षकांसोबत राहण्याची संधी 

महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षकांसोबत ग्रुपमध्ये राहून शैक्षणिक तंत्रज्ञानात अपडेट राहण्याची संधी, आपले अनुभव इतरांसोबत शेअर करण्यासाठी स्वत:चा ब्लॉग व सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 

प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया 

श्री. अतुल दौडकर सर (शिक्षक)
भैरवनाथ विद्यालय वाकी (बु.) ता. खेड जि.पुणे

श्री. सुभाष शिंदे सर (सह शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाई, औरंगाबाद   

सेवानिवृत्त प्राध्यापक सौ. अलका मांगले  मॅडम 


प्रशिक्षणार्थींनी लिहिलेल्या कविता 

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक

मी आहे तंत्र अडाणी
बडे सरांचा मंत्रकानी,

करील मजला तंत्रज्ञानी
गाऊ त्यांची गोड गाणी,

बडे सरांची अमृतवाणी
तंत्रज्ञानाचा खजिना भारी,

आम्हाला मोबाईलने जोडी
तोंडावर बोट हाताची घडी,

बडे सरांची जादूगिरी
मोबाईलशी लावली जोडी,

अँपची आहे मजाच न्यारी
तंत्रज्ञानाचा जुगाड भारी,

बडे सरांची वाणीच न्यारी..
आदरणीय बडे सर...!

तुमचा  प्रशिक्षणार्थी
श्री. राजेश तेलगोटे सर

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक

बडे सर तुम्ही खंरच कमाल केली
अवघड काम सोपं करूनी धमाल उडवून दिली.  

Advance डिजिटल तंत्रज्ञानातले तुम्ही मुरब्बी
प्रत्येक सेशन्स सुरेख पटवून केली आमची प्रगती.  
     
बोलण्याची अदा निराळी इतरांना खिळवून ठेवण्याची कला
बडे सर तुमचे डिजिटल ज्ञान पाहूनी अभिमान वाटतो आम्हाला.  
 
सगळेच सेशन्स तुम्ही उत्तमपणे आम्हास शिकवले .
सहजपणे तञज्ञानाची दालने
उघडून आम्हास डिजिटल करून टाकले.

या गृप मध्ये येऊन एक मनाला समाधान वाटले
बडे सरासारखे अनुभवी मार्गदर्शक यामध्ये भेटले.    
   
तुमचा उत्साह पाहूनी आम्हाला उत्तेजन मिळाले  
डिजिटल तंत्रज्ञान किती  महत्वाचे  हे तुमच्या मुळे कळाले.  
     
आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर
बडे सरासारखा अढळ ध्रुव तारा
जर कोणाला आढळला तर
समजून घ्या नक्कीच त्या व्यक्तीचा भाग्योदय झाला.  

तुमची  प्रशिक्षणार्थी
  सौ. ऊलका शिरीष कुलकर्णी

आम्ही तंत्रस्नेही शिक्षक
 
 बडे सरांचे ज्ञानस्नेही आहोत आपण  
आता तंत्र नवे शिकूया...
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या...

नाही अवघड काही येथे, फारच आहे easy
बडे सरांसोबत रोज आपण होऊ जरा Busy...  

सरांच्या meeting मध्ये जॉईन होऊन  
आपण दृष्टिकोन zoom करूया
 टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या....
 
Chatbox मध्ये मत मांडून होईल शंकासमाधान...
 युट्युब वर जाऊन करू ज्ञानाची देवाणघेवाण ...
 Login करू ezee app अन विश्वास मनात जागवू या...
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारे तंत्रस्नेही होऊ या...  

शिकवतो आपण नेहमी त्याला देऊ थोडे टेक्निक...
शाबास गुरुजीच्या वेबसाईटवर सारेच करू या क्लिक...
 
व्हिडिओ पाहून share, like अन download करु या  
टेक्नॉलॉजीच्या सोबत सारेच तंत्रस्नेही होऊ या ...

तुमची प्रशिक्षणार्थी
- करुणा

चला शाबास गुरूजींच्या शाळा
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।

 
OTG कनेक्शन, माऊस पाँईंटर,
Keep नोटसचा केला वापर,
गुगल ड्राइव्हचा दैवी अवतार
15GB चा फुकटचा वापर,
वेळ कोर्सची व्यवस्थित पाळा ||1||
 
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।
बँकग्राऊंड Eraser पाहिला
फोटो पाहिजे तसा बनविला,
पिक्सल लॅबवर प्रोजेक्ट केला
RAR वर मराठी फॉन्ट घेतला,
फोटो एडीटरचे नियम पाळा ।।2।।
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।|

KineMaster चा भावच न्यारा
आँडीओ व्हीडीओ चा येथे तोरा
अँनिमेशन टाईम करा अँडजस्ट
नाही तर वाजल तुमचा बोरा,
मिळेल ग्रिनस्क्रिनचा फळा ||3||
जमला तंत्रस्नेहींचा मेळा ।।
 
Xodo वर पाठ घेऊन
फेसबुक पेज दाखवा,
फार्मस अँपवर सर्वेहर्ट
माहिती पटापट मिळवा,
गुगल फॉर्म परीक्षेचा ताळा।।4।।
जमला तंत्रस्नेहींचा मेळा।

तुमचा प्रशिक्षणार्थी
श्री. शहाजी अनंत कुंभार 

सरस्वतीपूत्र सुभाष बडे सर

 ज्यांची भाषा सुस्पष्ट, साधी,सरळ,सोपी
असे  सुभाषिक सुभाष सर.  
नावाला साजेल असेच सुभाषिक आहात तुम्ही. काय बोलावं सर तुमच्याबद्दल .....
मूर्ती लहान पण ज्ञान मात्र बडे,
असे आमचे,आम्हाला आमच्या भाग्याने लाभलेले  सरस्वतीपुत्र बडे सर. *  
सर,  तुमचा अभ्यास बडा,  तुमचं ज्ञान अफाट( बडे)  
ते समजावून सांगण्याची कला बडी,  
ट्रेनिंग मधील वीस पंचवीस वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एका वेळेला हॅण्डल करण्याची तुमची क्षमता बडी, प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देऊन त्यांचे  शंकासमाधान करण्याचं तुमचं कौशल्य बडे.
अडीचशे-अडीचशे जणांचे ग्रूप सांभाळण्याचं तुमचं कौशल्य,आणि तुमचा संयम खूपच बडा.
तुमचं अध्यापन कौशल्य अफलातुन,
बडे सर तुमचा स्टॅमिना बडा, तुमचा वक्तशीरपणा बडा.
तुमची धडपड बडी, तुमचे प्रयत्न बडे.
आणि सर्वात महत्त्वाचे या सगळ्यांसाठी जे आवश्यक आहे ते  प्लॅनिंग जबरदस्त बडे.
जे काही स्वतःजवळ आहे,ते सगळं काही मनापासून देण्याची तुमची भावना बडी
काहीही हातचं राखून न ठेवता  संपूर्ण ज्ञान आपल्या समोरच्या प्रत्येक  वयोगटाच्या विद्यार्थ्यांला मनापासून देण्याचं  काम करणारा तुमच्यातला शिक्षक खूप खूप बडा आहे.
 काय बोलू आणखी तुमच्यासाठी सर, तोंडातून येतो एकच उद्गार, शाबास गुरुजी.
खरोखरच आपण सर्वार्थाने, सर्व बाजूंनी नावाप्रमाणेच बडे आहात सर,  तुमच्यातल्या या शिक्षकाला मनापासून सलाम. लाख मोलाचं ज्ञान देणा-या तुम्हाला,  तुमच्या या ज्ञानार्जन कार्यास, माझ्या लाख लाख शुभेच्छा. खूप खूप खूप धन्यवाद सर.
🙏🙏 *विद्वान सर्वत्र पूज्यंते हेच खरे 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐  
               
   ✒️ लेखन ✒️    
 ✍️ प्रशिक्षणार्थी सौ.अर्चना पाटील✍

शाब्बास गुरुजी

शाब्बास गुरुजींची टीम
आहे लईच ओ भारी!
बडे सर आणि टीमचे
राहु सदैव आम्ही आभारी!!
मनमिळावू स्वभाव
सेवाभावी वृत्ती जपली!
शाब्बास गुरुजींच्या टीमने
अध्यापनाची वाट दावली!!
सखोल आणि खोलवर
दिले तंत्रज्ञानाचे ओ धडे!
हसतमुख आणि दिलदार
आहेत सर आमचे ओ बडे!!
मोबाईल पडत होता भारी
त्याची कमी केली दादागिरी!
बनवून त्याला आमचा पीए
दिली आम्हाला ओ उभारी!!
कोरोनाच्या या संकटात
अवघड झाले अध्यापन!
कानमंत्र देऊन बडे सरांनी
वाढवली जगात आमची शान!!
आम्ही अडाणी गुरुजी
अडकून पडलो घरात!
ऑनलाईन अध्यापनाची करावी लागे कसरत!!
शाब्बास गुरुजींची टीम
आली बघा ती धाऊन!
हसत खेळत तंत्रज्ञानाचे
दिले आम्हा अनमोल ज्ञान!!
आता नाही मागे हटणार
शाब्बास गुरुजी होणार!
शाब्बास गुरुजी टीमचे
विश्वात नाव मी करणार!!
झालोय अॅडव्हांस आम्ही आता
नाही कशातच मागे राहणार!
घेऊन शाब्बास गुरुजींचे नाव
बिनधास्त उडी ओ मारणार!!
सोबत राहो अशीच आपली
मैत्रिच्या या कट्ट्यावर!
फडकत रहावा झेंडा
आपला तंत्रज्ञानाच्या या युगावर!!

कवी:- भा. रा. कडू संगमनेर जिल्हा अहमदनगर
+

शाबास गुरुजीसाठी दोन शब्द
 आभार कसे मानू सर, शब्द अपुरे पडले,  
भावना इतक्या भरल्या आहेत, मन माझे गोठले|      
शब्दात नाही मांडता येत येत भाव माझ्या मनीचे |  
पण नक्की माझे भाव कळतील शब्दांच्या पलीकडचे||      
नेत्रा मॅडम मुळे मी या ऍडव्हान्स कोर्सला आले  
बडे सर त्यामुळेच मी तुमच्या जादुई दुनियेत पोहोचले    
पंधरा दिवसात सर तुम्ही, आम्हाला जादूच्या नगरीत नेले| वेगवेगळे ॲप्स शिकवून स्पर्धेच्या जगात जगायला शिकवले|   राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होऊन तुम्हाला गर्व नाही कुठला   तुमच्या रूपाने आम्हाला एक जादूगार की हो भेटला     तंत्रज्ञानाचा खजिना तुम्ही आमच्या पुढे ठेवला    
लाखो शिक्षकांच्या घरोघरी ज्ञानाचा दिवा लावला      
प्रत्येक दिवस सर तुम्ही,आमचा नाविन्याने भरला    
मनापासून तळमळीने शिकवताना जीव तुम्ही ओतला           पैशात तुमचे मोल सर कधीच मोजता येणार नाही      
ज्ञानाचे मोल तुमचे पैशाने भरून निघणार नाही            
 रोज रोज नवीन फंडे घेऊन, शाबास गुरुजी तुम्ही आलात लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचून प्रत्‍येकाला तंत्रस्नेही बनवतात             एवढ्याशा छोट्या मोबाईलची करामत
सर तुम्ही आम्हाला शिकवली      
त्याला आमचा PA करून
गुगलवर क्लाऊड स्पेस ची ओळख करून दिली            
पेन हातात न घेता कीप नोट्स वर लिहायला शिकवले बॅकग्राऊंड इरेझर ने मॅजिक इफेक्ट ग्राफिक्सने आणता आले         मराठी कॅलिग्राफीने तर कमालच केली,
हँडरायटिंग बदलले एका क्लिकने
माझे हँड रायटिंग स्टायलिश की हो झाले    
काईन मास्टरचा तर नखरा की हो आगळा वेगळा  
बेसिक ,ऍडव्हान्स ,सुपर अँडव्हान्स ने लावला मला लळा     किती घेऊ विषय नि किती करू त्यांचे व्हिडिओज
असे  मला  झाले    
कल्पनांच्या पंखांना उडण्याचे बळ काईन मास्टर ने दिले  बेनीमच्या मेनूंमुळे आम्हाला कल्पनेच्या जगात नेऊन सोडले व्हाईट बोर्ड च्या ॲनिमेशनने  बोर्ड्स छान कलरफुल झाले   पीडीएफ फाईल चा प्रभावी वापर कसा करावा हे कळले फेसबुक पेज वरील ब्लॉग्स सगळ्यांनी वाचले
खूप लाईकस आणि कमेंटसही फेसबुक पेजवर आल्या   त्यामुळे आत्मविश्‍वास वाढला नि
आनंदाच्या लाटा मनात उसळल्या      
 गुगल फॉर्मस् नि क्विज तयार करता येऊ लागली    
नवीन माझ्या बिझनेसला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळाली       काही आम्हाला आडले तर , हाक मारू सर आम्ही तुम्हाला हाक मारताच मदतीला याल सर, खात्री आहे आम्हाला       खूप खूप धन्यवाद नि खूप खूप शुभेच्छा  
तुमचे स्वप्न पूर्ण होऊ दे  
आमची सदिच्छा  
आमची सदिच्छा  !                              
✒️ लेखन ✒️
✍️सौ. संजीवनी औटी✍️

सरस्वतीपूत्र सुभाष बडे सर

 ज्यांची भाषा सुस्पष्ट, साधी,सरळ,सोपी
असे  सुभाषिक सुभाष सर.  
नावाला साजेल असेच सुभाषिक आहात तुम्ही. काय बोलावं सर तुमच्याबद्दल .....
मूर्ती लहान पण ज्ञान मात्र बडे,
असे आमचे,आम्हाला आमच्या भाग्याने लाभलेले  सरस्वतीपुत्र बडे सर. *  
सर,  तुमचा अभ्यास बडा,  तुमचं ज्ञान अफाट( बडे)  
ते समजावून सांगण्याची कला बडी,  
ट्रेनिंग मधील वीस पंचवीस वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एका वेळेला हॅण्डल करण्याची तुमची क्षमता बडी, प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देऊन त्यांचे  शंकासमाधान करण्याचं तुमचं कौशल्य बडे.
अडीचशे-अडीचशे जणांचे ग्रूप सांभाळण्याचं तुमचं कौशल्य,आणि तुमचा संयम खूपच बडा.
तुमचं अध्यापन कौशल्य अफलातुन,
बडे सर तुमचा स्टॅमिना बडा, तुमचा वक्तशीरपणा बडा.
तुमची धडपड बडी, तुमचे प्रयत्न बडे.
आणि सर्वात महत्त्वाचे या सगळ्यांसाठी जे आवश्यक आहे ते  प्लॅनिंग जबरदस्त बडे.
जे काही स्वतःजवळ आहे,ते सगळं काही मनापासून देण्याची तुमची भावना बडी
काहीही हातचं राखून न ठेवता  संपूर्ण ज्ञान आपल्या समोरच्या प्रत्येक  वयोगटाच्या विद्यार्थ्यांला मनापासून देण्याचं  काम करणारा तुमच्यातला शिक्षक खूप खूप बडा आहे.
 काय बोलू आणखी तुमच्यासाठी सर, तोंडातून येतो एकच उद्गार, शाबास गुरुजी.
खरोखरच आपण सर्वार्थाने, सर्व बाजूंनी नावाप्रमाणेच बडे आहात सर,  तुमच्यातल्या या शिक्षकाला मनापासून सलाम. लाख मोलाचं ज्ञान देणा-या तुम्हाला,  तुमच्या या ज्ञानार्जन कार्यास, माझ्या लाख लाख शुभेच्छा. खूप खूप खूप धन्यवाद सर.
🙏🙏 *विद्वान सर्वत्र पूज्यंते हेच खरे 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐  
               
   ✒️ लेखन ✒️    
 ✍️ प्रशिक्षणार्थी सौ.अर्चना पाटील✍

शाब्बास गुरुजी

शाब्बास गुरुजींची टीम
आहे लईच ओ भारी!
बडे सर आणि टीमचे
राहु सदैव आम्ही आभारी!!
मनमिळावू स्वभाव
सेवाभावी वृत्ती जपली!
शाब्बास गुरुजींच्या टीमने
अध्यापनाची वाट दावली!!
सखोल आणि खोलवर
दिले तंत्रज्ञानाचे ओ धडे!
हसतमुख आणि दिलदार
आहेत सर आमचे ओ बडे!!
मोबाईल पडत होता भारी
त्याची कमी केली दादागिरी!
बनवून त्याला आमचा पीए
दिली आम्हाला ओ उभारी!!
कोरोनाच्या या संकटात
अवघड झाले अध्यापन!
कानमंत्र देऊन बडे सरांनी
वाढवली जगात आमची शान!!
आम्ही अडाणी गुरुजी
अडकून पडलो घरात!
ऑनलाईन अध्यापनाची करावी लागे कसरत!!
शाब्बास गुरुजींची टीम
आली बघा ती धाऊन!
हसत खेळत तंत्रज्ञानाचे
दिले आम्हा अनमोल ज्ञान!!
आता नाही मागे हटणार
शाब्बास गुरुजी होणार!
शाब्बास गुरुजी टीमचे
विश्वात नाव मी करणार!!
झालोय अॅडव्हांस आम्ही आता
नाही कशातच मागे राहणार!
घेऊन शाब्बास गुरुजींचे नाव
बिनधास्त उडी ओ मारणार!!
सोबत राहो अशीच आपली
मैत्रिच्या या कट्ट्यावर!
फडकत रहावा झेंडा
आपला तंत्रज्ञानाच्या या युगावर!!

कवी:- भा. रा. कडू संगमनेर जिल्हा अहमदनगर
+


श्री. सुभाष बडे सर 

तंत्रस्नेही प्रशिक्षक 

श्री. हरिनाथ कांबळे सर 

Management Head